- मुख्यपृष्ठ
- आमच्याबद्दल
परिचय
गावा विषयी
ग्रामपंचायत शिराळा (Shirala) हे महाराष्ट्र राज्यातील धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात वसलेले एक शांत, सामाजिकदृष्ट्या सुसंस्कृत आणि विकासाभिमुख गाव आहे. ग्रामविकास, स्वच्छता, पाणीपुरवठा व मूलभूत सुविधांवर सातत्याने दिला जाणारा भर यामुळे अनाळाने परिसरात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
शिराळा गाव परंडया पासून 12 किलोमीटर आणि धाराशिव पासून 78 किलोमीटर आहे. 2011नुसार लोकसंख्या 2492 एवढी आहे. आणि सुमारे 515 कुटुंब वास्त्याव्यास आहेत. गावाला सीना नदी असून त्यामध्ये उजनी धारणाचे बारमाही पाणी असते. शेतीचे मुख्य पीक ऊस व द्राक्षे असून बेदाणा उत्पादन होत असून अनेक हंगामी पिके घेतली जातात. गावात महादेव मंदिर, दत्त मंदिर, अंबाबाई मंदिर, बिरोबा मंदिर, नरसिह मंदिर हनुमान मंदिर, भैरवनाथ मंदिर, बाळूमामा मंदिर आहेत.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत शिराळा मार्फत अनेक लोकाभिमुख व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. सार्वजनिक स्वच्छता, ग्रामसभा आयोजन, महिला बचत गट प्रशिक्षण, ग्रामदरबार उपक्रम, लसीकरण मोहीम तसेच प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुलांचे वितरण यामुळे नागरिकांना शासकीय सुविधा पारदर्शक व वेळेवर उपलब्ध होत आहेत.
स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने गावात घंटागाडीच्या माध्यमातून ओला व सुका कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक व धार्मिक स्थळांची नियमित स्वच्छता तसेच हिरवळीचे जतन यावर भर देण्यात येत आहे. मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छतागृहे, बस थांबा निवारा शेड आणि नागरिकांसाठी बसण्याची सोय या सुविधांमुळे ग्रामस्थांचे जीवनमान उंचावले आहे.
एकूणच, शिराळा हे गाव लोकसहभाग, शिस्तबद्ध प्रशासन, स्वच्छता, सामाजिक एकोपा आणि सातत्यपूर्ण विकास यांचे उत्तम उदाहरण असून भविष्यातही आदर्श व प्रगत ग्रामपंचायत म्हणून वाटचाल करत राहील.
लोकसंख्या
0
कुटुंबसंख्या
0
भौगोलिक क्षेत्र फळ
0
कार्यपद्धती
ग्रामविकास विभाग राज्य स्तरावर मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करतो. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे विविध योजना अंमलात आणल्या जातात. ग्रामीण भागातील विकासासाठी शासनाच्या विविध योजना आणि कार्यक्रम प्रभावीपणे राबवले जातात.
उद्दिष्टे
लोकसंख्याशास्त्रीय प्रोफाइल
Updated on : 1 year - 1 mon - 30 days ago
3
Total Area (in sq. km)
Updated on : 1 year - 1 mon - 30 days ago
1471
Male
1327
Female
2798
Total
Updated on : 1 year - 1 mon - 30 days ago
325
ST
31
SC
1221
OBC
Updated on : 1 year - 1 mon - 30 days ago
503
Children (0-6yrs)
408
Children (6-18yrs)
दृष्टी आणि ध्येय
दृष्टी
स्वच्छ, सुंदर, विकसित आणि आत्मनिर्भर गावांची निर्मिती करणे.